Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीदर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण- गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण- गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- हिवताप प्रतिबंध विशेष कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकाऱ्यांकरिता मलेरिया मायक्रोस्कोपी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.श्याम निमगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण असून त्यामुळे हिवताप आजाराचे त्वरित निदान व त्वरित उपचार करणे सोइचे होणार; असे श्रीमती आयुषी सिंह यांनी सांगितले. 

राष्ट्रीय मलेरिया अनुसंधान संस्थान,दिल्ली यांचेतर्फे श्री.साई इंन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग मेडिकल सायन्स गडचिरोली येथे दिनांक-१३ मे ते १८ मे २०२४ पर्यंत  प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे.प्रशिक्षणात हिवतापाची लागण झालेल्या रुग्णावर योग्य उपचार करण्यासाठी रक्ताची चाचणी करून हिवतापाचे परजीवी व त्यांचे प्रजाती निश्चित करणे,हिवतापाचे परजीवी मानवी शरीरातील विकासाचे टप्पे व त्यांचे जीवनचक्र तसेच हिवतापाचे जलद निदान व आर.डी.के.चाचन्यांची गुणवत्ता याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मुलभूत प्रशिक्षण प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी यांना दिले जाणार आहे. 

प्रशिक्षण सत्र शुभारंभप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.लोकेशकुमार कोटवार,केंद्र स्तरीय प्रशिक्षक श्री.नसीम,टेकनिकल ऑफिसर, श्री. हरीओम,टेकनिकलअसिस्टंट राष्ट्रीय मलेरिया अनुसंधान संस्थान, दिल्ली,राज्य स्तरीय प्रशिक्षक डॉ. संजय कार्लेकर, कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, श्री. भास्कर सूर्यवंशी,श्री.कृष्णा अवधूत, आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर, श्री.सचिन डोंगरे,प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी, हिवताप कार्यालय अकोला उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!