उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- अनेक दिवसांपासून दुकानदारांना रेशन वितरणात पीओएस मशिनच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे कार्डधारकांनाही धान्य मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.यासाठी नवीन मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी रेशन दुकानदार संघटनेने अनेक दिवसांपासून केली होती.अखेर शहरातील रेशन दुकानदारांना नवीन पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले.
४-जी नेटवर्कसोबतच नवीन मशिन्समध्ये इन्कम स्कॅनची सुविधाही देण्यात आली आहे.त्यामुळे धान्य वितरणाचे व्यवहार गतिमान होणार आहेत.नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे सचिव तिरेश अग्रवाल यांनी सांगितले की,बायोमेट्रिक प्रणालीवर अंगठा जुळत नसल्यास,कार्डधारकांना इन्कम स्कॅनच्या सुविधेचा वापर करून धान्य मिळू शकेल.त्यामुळे धान्य वितरण सोपे होणार आहे.

