- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना आज,मंगळवार १३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास टेकरी गावालगतच्या शेतशिवारात घडली.भाऊराव विठोबा राऊत वय ४७ वर्षे रा.तोरगाव,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून भाऊराव राऊत यांचे शेत टेकरी गावालगत असून,ते सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेले होते.अश्यातच घरी जाण्याच्या तयारीत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घालून हल्ला चढवला. हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अगदी गावालगत आणि रस्त्याच्या कडेला ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- Advertisement -

