Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट..

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण,समावेशक व भविष्यमुखी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘शाळा परिवर्तन प्रकल्प’(स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प)प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.शासन-खासगी भागीदारीतून शासकीय शाळांचा सर्वांगीण विकास साधणारा हा प्रकल्प गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.
हा प्रकल्प राष्ट्रीय देयके महामंडळ(National Payments Corporation of India)आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन(Learning Links Foundation) यांच्यात ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या सामंजस्य करारानंतर सुरू करण्यात आला आहे.प्रकल्पासाठी राष्ट्रीय देयके महामंडळाकडून अर्थसहाय्य देण्यात येत असून,लर्निंग लिंक्स फाउंडेशनमार्फत अंमलबजावणी केली जात आहे.या कामकाजात जिल्हा परिषद, शालेय शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र शासन यांचा समन्वय आहे.
डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पहिला ते चौथा टप्पा पूर्ण करून १२५ शाळांचा विकास करण्यात आला.सध्या सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यात(जून २०२५ ते नोव्हेंबर २०२६)५० अतिरिक्त शाळांचा समावेश होत आहे.त्यामुळे आरमोरी,अहेरी, चामोर्शी,देसाईगंज(वडसा),धानोरा,गडचिरोली,कोरची आणि कुरखेडा या आठही तालुक्यांतील एकूण १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांपर्यंत प्रकल्पाची व्याप्ती वाढली आहे.
‘शाळा परिवर्तन प्रकल्पा’त माहिती व तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वर्गखोल्या,ग्रंथालये,विज्ञान प्रयोगशाळा, गणित व क्रीडा शिक्षण साधने, ‘इमारत शिक्षणाचे साधन’ (बिल्डिंग अ‍ॅज लर्निंग एड) संकल्पनेतील शैक्षणिक भित्तीचित्रे,शाळा परिसर व दर्शनी भागांचे सौंदर्यीकरण, स्वच्छतागृहे,शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (जलशुद्धीकरण यंत्रणा),शिक्षक प्रशिक्षण व क्षमता वृद्धी कार्यक्रम,विद्यार्थ्यांच्या आरोग्य व तंदुरुस्ती उपक्रम,शाळा व्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण,समुदाय सहभाग वाढविणे यांचा समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत लाभार्थी शाळा अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणारा ‘शाळा परिवर्तन प्रकल्प’ हा सार्वजनिक-खासगी भागीदारीचा प्रभावी नमुना ठरत असून,आदिवासी व दुर्गम भागांमध्ये सक्षम, समावेशक आणि गुणवत्तापूर्ण सार्वजनिक शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीकोनाला बळ देत आहे.गडचिरोलीतील जिल्हा परिषद शाळांचा हा कायापालट राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!