Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीचोप येथील पंकज लाडे जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित..

चोप येथील पंकज लाडे जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण-२०१२ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या युवा धोरण-२०१२ नुसार जिल्ह्यातील युवक,युवती तसेच सामाजिक संस्थांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने पार पडले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.या पुरस्कारामुळे युवक-युवती व सामाजिक संस्थांना युवक विकासाच्या कार्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती गडचिरोली यांच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षासाठी पुढील पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.
युवक पुरस्कारासाठी पंकज सुधाकर लाडे रा.चोप,पो. कोरेगांव,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली,युवती पुरस्कारासाठी जान्हवी विजय पेद्दीवार रा.चामोर्शी, जि.गडचिरोली तर संस्थात्मक पुरस्कारासाठी आधार विश्व फाउंडेशन,गडचिरोली(सुशील रामराव हिंगे, आशिर्वाद हिंगे,आशिर्वाद नगर,कॅनरा बँकेच्या मागे, गडचिरोली यांची निवड करण्यात आली.
या पुरस्कारांचे स्वरूप युवक व युवती यांना प्रत्येकी रोख रक्कम रुपये दहा हजार,तर संस्थेला रोख रक्कम पन्नास हजार,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
या प्रसंगी जिल्हा युवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी नितिन गावंडे,सदस्य सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे,पुरस्कारार्थी, संस्थेचे पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!