Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजलाडक्या बहिणींचा कागद पत्रांचा तिढा सुटेना; महिला मजूर शेतीसाठी मिळेना..!

लाडक्या बहिणींचा कागद पत्रांचा तिढा सुटेना; महिला मजूर शेतीसाठी मिळेना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कागदपत्रांच्या अटी शिथिल झाल्या असल्या तरी,या योजनेतील लाडक्या बहिणी काही कुणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. कागदपत्रांसाठी त्यांची धावपळ सुरूच आहे.योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. खरीप हंगामातील शेतीच्या कामाकडे पाठ फिरवून त्या कागदपत्र व अर्ज भरण्यासाठी भटकत असून, शेतकऱ्यांना मजुरांकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्यात अद्याप धुवाधार पाऊस नसला तरी, आतापर्यंत आलेल्या पावसामुळे शेतशिवार हिरवेगार झाले आहे.त्यातच सिंचन क्षेत्रात रोवणीला वेग आला आहे.यासाठी महिला मजुरांची गरज पडत आहे.ऐन शेती कामाच्या हंगामात राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.योजने अंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याने या योजनेच्या लाभाकरिता अर्ज भरण्यासाठी धडपड सुरू आहे.याकरिता आवश्यक कागदपत्र मिळविण्यासाठी सध्या दाही दिशा भटकंती सुरू आहे.त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना महिला मजूर बांधावर येण्यासाठी वाट पहावी लागत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!