उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्या २००५ अंतर्गत रोजगार हमीच्या कामावर जाण्याकरिता मजुरांना रोजगार मागणीचा अर्ज नमुना ४ मध्ये भरावा लागतो.त्यात मजुरांची संपूर्ण माहिती भरली जाते.जसे; अर्जदाराचे नाव,कामाचा कालावधी,जॉब कार्ड नंबर,बँक खाते क्रमांक व अर्ज क्रमांक व इतर अशी माहिती भरून रोजगार सेवकांकड दिली जाते.रोजगार हमीच्या कामाची मागणी करतांना नमुना ४ भरल्या नंतर अर्ज क्रमांक नंबर व केव्हा काम दिल्या जाईल;असा स्पष्ट उल्लेख असलेली पोच पावती मागवा.कामाच्या मागणीची पोच पावती जपून ठेवा.
कामाची मागणी केल्यापासून जर,कां १५ दिवसांत मजुराला काम उपलब्ध करून दिले गेले नाही.तर तो मजूर बेरोजगार भत्ता घेण्यासाठी पात्र ठरतो.बेरोजगार भत्ता मिळविण्यासाठी कामाच्या मागणीच्या अर्जाची पोच पावती मजुरांजवळ असणे आवश्यक आहे.केव्हा-केव्हा बेरोजगार भत्ता मजुरांना मिळू नये याकरिता पोच पावती दिलीच जात नाही किंवा बेरोजगार भत्ता मिळण्याबाबत मजुरांना याची कल्पनाच नसल्याने कामाच्या मागणीची पोच पावती घेतली जात नसल्याचे दिसून येते.मजुरांनी पोच पावतीची मागणी केल्यास,कशाला पोच पावती पाहिजे; असे संबंधित रोजगार सेवक व कर्मचारी यांनी म्हटले तर सरळ उपजिल्हाधीकारी रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करा वा गावातील रोजगार हमी योजना दक्षता समितीच्या अध्यक्षाकडे तक्रार करा. कामाच्या मागणीची पोच पावती व बेरोजगार भत्ता मिळण्याची रोजगार हमी योजना कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख असून यावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
कामाची मागणी केल्यास मागणी अर्जाची पोच पावती प्रत्येक मजुर कुटुंबातील सदस्यांनी घ्यावी.कामाची मागणी केल्यास १५ दिवसांत काम दिले जात नसेल तर बेरोजगार भत्ता मागवा.