Tuesday, June 23, 2026
Homeनागपूरपोलीस पाठलाग करीत असतांना तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी; उपचारा दरम्यान झाला मृत्यु -...

पोलीस पाठलाग करीत असतांना तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी; उपचारा दरम्यान झाला मृत्यु – नागपूर शहरातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- पोलीस पाठलाग करीत असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नागपुर शहरात सदर घटना घडली असून इम्रान शेख असे आरोपीचे नाव आहे.

गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात इम्रान शेख वरती देवलापार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांना तो चकमा देत होता.नागपूर जिल्ह्यातील देवलापार मध्ये इमरान शेख नावाच्या व्यक्तीचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते.इम्रान हा नागपूरच्या कपिल नगर परिसरातल्या म्हाडा क्वार्टर मध्ये असल्याची गुपित माहिती पोलिसांना मिळाली होती.सदर माहितीच्या आधारावरती पोलीस काल रविवारी म्हाडा क्वार्टर्स मध्ये पोहोचले.पोलीस आल्याचे दिसताच इम्रान शेख यांनी तिसऱ्या मजल्यावर उडी घेतली.घटनेत इम्रान गंभीर जखमी झाला होता.त्यामुळे त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज १३ फेब्रुवारीला सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान,या प्रकरणात इम्रान शेख यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईमुळे इम्रान मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. इम्रानच्या नातेवाईकांच्या आरोपाची चौकशी केली जाईल; असे नागपूर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!