Wednesday, September 23, 2026
Homeमूलशेतात काम करीत असतांना अस्वलाचा हल्ला; महिला गंभीर जखमी- मूल तालुक्यातील दुपारची...

शेतात काम करीत असतांना अस्वलाचा हल्ला; महिला गंभीर जखमी- मूल तालुक्यातील दुपारची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर (मूल) :- मूल तालुक्यातील मोरवाही येथील महिला देवकाबाई पत्रु झरकर सकाळच्या सुमारास शेतातील लाखोरी काढण्याकरिता गेली असता अस्वलाने दुपारच्या सुमारास अचानकपणे हल्ला चढविल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.सदर घटना आज १३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.

दुपारच्या सुमारास महिला शेतात काम करीत असतांना अचानकपणे अस्वलाने महिलेवर प्राणघातक हल्ला केला.महिलेने आरडाओरड केल्याने अस्वल पळून गेली.त्यामुळे महिला थोडक्यात बचावली आहे.सदर घटनेची माहिती कुटुंबियांना होताच; त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर

महिलेला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.परिसरात सुरुवातीला वाघांचा धुमाकूळ सुरू होता; मात्र आता अस्वलाने हल्ला चाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने सदर घटनेविषयी दुर्लक्ष न करता तात्काळ अस्वल व वाघांचा बंदोबस्त करावा.अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!