Wednesday, September 23, 2026
Homeमूलतेंदूपत्ता तोंडणीसाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने झडप घेवुन केले ठार...

तेंदूपत्ता तोंडणीसाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने झडप घेवुन केले ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल(चंद्रपूर) :- तेंदूपत्ता तोंडणीसाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील भादुर्णा नंबर २ कक्ष क्रं.३२४ मध्ये काल,गुरुवारी (दि.९) सकाळी ६ वाजता दरम्यान घडली.तुळशिराम सुरेश सोनुले वय ३४ वर्ष रा. रत्नापूर असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

मूल तालुक्यात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने मिळेल तो काम करून आपली उपजिवीका करीत होता. सध्या तेंदूपत्ता तोडणींच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगलव्याप्त परिसर आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील रत्नापूर येथील जवळपास १५ जण तेंदूपत्ता तोडणीसाठी बफर क्षेत्रातील भादुर्णा नंबर २ येथील कक्ष क्रमांक ३२४ मध्ये गेला होता.दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने तुळशीराम सुरेश सोनुले वय ३४ वर्ष याच्यावर हल्ला करून जागीच ठार केला.नागरिकांनी आरडाओरड करून घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला दिली.मूल येथील वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहा. पाकेवार,मूल पोलिस स्टेशनचे पो.निरीक्षक सुमित परतेकी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.वनविभागाने मृतकाच्या कुटुंबीयाना २० हजारांची आर्थिक मदत केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर,गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!