Saturday, May 2, 2026
Homeगोंदियाअखेर मध्यरात्री सासरा,पत्नी आणि मुलाला जिवंत जाळणाऱ्या किशोर शेंडे ला फाशीची शिक्षा…- गोंदिया जिल्हा...

अखेर मध्यरात्री सासरा,पत्नी आणि मुलाला जिवंत जाळणाऱ्या किशोर शेंडे ला फाशीची शिक्षा…- गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतलेल्या आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री सासरा,पत्नी आणि मुलाला जिवंत जाळले होते.मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. अशातच आता गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.गोंदिया जिल्हा सत्र न्यायायलयाने पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे.

गोंदिया शहराच्या सूर्याटोला भागात राहणारी महिला १४ फेब्रुवारी २०२३ माहेरी आली असताना तिच्या पतीने सासरी येत पत्नी तसेच ५ वर्षीय मुलगा आणि सासर्‍याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले होते.त्यानंतर पोलिसानी आरोपीला काही तासातच अटक केली होती.अशातच आज दिनांक – ९ मे रोजी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला आज फाशीची शिक्षा सुनाविली आहे.

दरम्यान,हा निकाल कन्फरमेशनकरिता हायकोर्टात जाणार असून तिथून ही शिक्षा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे.तर या प्रकरणाची गंभिर्यता पाहता या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नागपूर कोर्टात काम करीत असलेले सरकारी वकील विजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती.या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनाविण्याकरिता महत्वाचे पुरावे घेत युक्तिवाद केल्याने आज हा निकाल मार्गी लागला.कोर्टाच्या निर्णयानंतर पिडीतांच्या कुटूंबियानी समाधान व्यक्त केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!