Wednesday, September 23, 2026
Homeकोल्हापूरचंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाचखोर अधीक्षक संजय पाटील च्या घरांवर छापे…-बंगल्याच्या...

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाचखोर अधीक्षक संजय पाटील च्या घरांवर छापे…-बंगल्याच्या झडतीत २८ तोळे सोन्याचे दागिने,१२ लाखांची आलिशान मोटार,२ मोटारसायकली,२५ हजार ८०० रुपयांची रोकड तसेच ८० लाख रुपये किमतीचा बंगला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोल्हापूर :- चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाचखोर अधीक्षक संजय पाटील वय ५४ वर्ष, मूळ रा.फिरंगाई तालीम,काळकाई गल्ली, शिवाजी पेठ) यांच्या येथील शिवाजी पेठ,आर.के.नगर व शिरदवाड (ता.शिरोळ) येथील घरांवर टाकलेल्या छाप्यांत २८ तोळे सोन्याचे दागिने,आलिशान मोटार आणि ८० लाखांचा बंगला व इतर अशी सुमारे दीड कोटीची मालमत्ता उघड झाली.बीअर शॉपीच्या परवान्यासाठी व्यावसायिकाकडून कनिष्ठ अधिकाऱ्यामार्फत एक लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांत अधीक्षक संजय पाटीलसह चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे,कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांचा समावेश आहे.यापैकी खारोडे व खताळ यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले आहे.सापळा कारवाईत दोन अधिकाऱ्यांना अटक झाली आहे.अधीक्षक पाटील पसार झाले आहेत.पथकाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक बापू साळोखे, आसमा मुल्ला यांच्या पथकाने अधीक्षक पाटील यांच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ व आर.के.नगर तसेच शिरदवाड (ता. शिरोळ) येथील घरांवर छापेमारी करून झडती घेतली.

आर.के.नगर येथील अधीक्षक पाटील यांच्या बंगल्याच्या झडतीत २८ तोळे सोन्याचे दागिने,१२ लाखांची आलिशान मोटार, २ मोटारसायकली,२५ हजार ८०० रुपयांची रोकड तसेच ८० लाख रुपये किमतीचा बंगला,अशी दीड कोटीची मालमत्ता आढळून आली आहे,अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नाळे यांनी दिली.

चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधीक्षक संजय पाटील यांचे कोल्हापूरसह शिरदवाड येथे काही काळ वास्तव्य होते,अशीही माहिती मोबाईल लोकेशनद्वारे निष्पन्न झाली आहे.शोध पथकाचा सुगावा लागताच संशयित पाटील शिरदवाड येथून पसार झाल्याचेही नाळे यांनी सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांनी सांगितले की, घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील गोदावरी बार अँड रेस्टॉरंटचे मालक असलेल्या तक्रारदारांनी नवीन बीअर बार शॉपीचा परवाना मिळण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता.मात्र,अधीक्षक संजय पाटील,दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी टाळाटाळ सुरू केली होती.

तक्रारदार व्यावसायिकाने खारोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधीक्षक संजय पाटील व स्वतःसाठी एक लाखाच्या लाचेची मागणी केली. व्यावसायिकाने पथकाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्याशी संपर्क साधून फिर्याद दाखल केली.पथकाने दि.२५ एप्रिल, दि. ३ मे रोजी पडताळणी केली.त्यानंतर संशयिताच्या वतीने एक लाखाची लाच घेताना पथकाने कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना रंगेहाथ पकडले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!