Friday, August 21, 2026
Homeनागपूरखासगी मत्स्यपालन केंद्रावर धाड; प्रतिबंधित वाघूर मासे जप्त.. - वाघूर माशांच्या पालनासह...

खासगी मत्स्यपालन केंद्रावर धाड; प्रतिबंधित वाघूर मासे जप्त.. – वाघूर माशांच्या पालनासह वापरावर बंदी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित लवाद प्रशासनाने सन २००० मध्ये वाघूर माशांच्या पालनासह वापरावर बंदी घातली आहे.वाघूर माशांना  थाई मांगूर असेही म्हटले जाते.हे मासे अजैविक कचरा खात असल्याने त्यांच्या शरीरात झिंक,कॅडमियम,अर्सेनिक यासह अन्य अत्यंत घातक घटक व जड धातू असतात.त्यामुळे हे मासे पर्यावरणासोबत मानवी आरोग्याला हानीकारक असल्याने त्यांच्या उत्पादन,वापर,साठवणूक व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.अश्यातच नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील चिचोली शिवारात एका खासगी मत्स्यपालन केंद्रात वाघूर माशांचे पालन व उत्पादन केले जात असल्याची माहिती नागपूर येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त शुभम कोमरेवार यांना मिळाली असता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पारशिवनी पोलिसांच्या मदतीने धाड टाकून तब्बल ३६ टन प्रतिबंधित वाघूर मासे जप्त करून नष्ट केले.सदरची कारवाई काल गुरुवारी करण्यात आली असून प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सदरची कारवाई सहाय्यक मत्स्य आयुक्त शुभम कोमरेवार यांच्यासह पारशिवनीचे ठाणेदार किशोर शेरकी,सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अंकित वैद्य,प्रशांत वैद्य व निखिल नरड, कनिष्ठ लिपिक सतीश क्षीरसागर,सहाय्यक फौजदार देवानंद उकेबोंद्रे,पोलिस हवालदार सुरेश धुर्वे यांच्याह कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पोलीस हवालदाराने दम देत परिसरात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर ३५...

पूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात  जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज शुक्रवारी वाटप...

रक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.. – आज ५७ रक्तदात्यांचे रक्तदान; मिसार दाम्पत्य ठरले प्रेरणादायी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या उद्या,शनिवार २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार...

खतांच्या वाढिव किंमती कमी करुन युरिया खताचा काळाबाजार रोखण्याची मागणी.. – देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-खताच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आला असुन सद्या कृषी केन्द्रांमार्फत युरिया खताचा काळाबाजार सुरु आहे.या भ्रष्टाचारावर लगाम घालुन खताच्या किंमती पुर्ववत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!