Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजरोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी करा; काम न दिल्यास बेरोजगार भत्ता मागवा....!

रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी करा; काम न दिल्यास बेरोजगार भत्ता मागवा….!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्या २००५ अंतर्गत रोजगार हमीच्या कामावर जाण्याकरिता मजुरांना रोजगार मागणीचा अर्ज नमुना ४ मध्ये भरावा लागतो.त्यात मजुरांची संपूर्ण माहिती भरली जाते.जसे; अर्जदाराचे नाव,कामाचा कालावधी,जॉब कार्ड नंबर,बँक खाते क्रमांक व अर्ज क्रमांक व इतर अशी माहिती भरून रोजगार सेवकांकड दिली जाते.रोजगार हमीच्या कामाची मागणी करतांना नमुना ४ भरल्या नंतर अर्ज क्रमांक नंबर व केव्हा काम दिल्या जाईल;असा स्पष्ट उल्लेख असलेली पोच पावती मागवा.कामाच्या मागणीची पोच पावती जपून ठेवा.

कामाची मागणी केल्यापासून जर,कां १५ दिवसांत मजुराला काम उपलब्ध करून दिले गेले नाही.तर तो मजूर बेरोजगार भत्ता घेण्यासाठी पात्र ठरतो.बेरोजगार भत्ता मिळविण्यासाठी कामाच्या मागणीच्या अर्जाची पोच पावती मजुरांजवळ असणे आवश्यक आहे.केव्हा-केव्हा बेरोजगार भत्ता मजुरांना मिळू नये याकरिता पोच पावती दिलीच जात नाही किंवा बेरोजगार भत्ता मिळण्याबाबत मजुरांना याची कल्पनाच नसल्याने कामाच्या मागणीची पोच पावती घेतली जात नसल्याचे दिसून येते.मजुरांनी पोच पावतीची मागणी केल्यास,कशाला पोच पावती पाहिजे; असे संबंधित रोजगार सेवक व कर्मचारी यांनी म्हटले तर सरळ उपजिल्हाधीकारी रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करा वा गावातील रोजगार हमी योजना दक्षता समितीच्या अध्यक्षाकडे तक्रार करा. कामाच्या मागणीची पोच पावती व बेरोजगार भत्ता मिळण्याची रोजगार हमी योजना कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख असून यावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

कामाची मागणी केल्यास मागणी अर्जाची पोच पावती प्रत्येक मजुर कुटुंबातील सदस्यांनी घ्यावी.कामाची मागणी केल्यास १५ दिवसांत काम दिले जात नसेल तर बेरोजगार भत्ता मागवा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!