- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याकरिता सत्यवान रामटेके यांनी तक्रार करण्यापासून ते आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता.तक्रारीत शासन स्तरावरून १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना सुरू करण्यात आली.त्यानुसार देसाईगंज सामाजिक वनिकरण विभागाच्या मार्फतीने देसाईगंज, कुरखेडा,आरमोरी व कोरची या चारही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली.वृक्ष लागवडीसाठी सुरुवातीला खड्डे खोदकाम, विविध प्रजातींची रोपे खरेदी,रोपे वाहतूक करून मजुरांच्या मार्फतीने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली आहेत.लागवड करण्यात आलेल्या वृक्ष रोपांची तीन वर्षे प्रत्येक साईटवर मजुर नेमून रोपांना पाणी देणे,सभोवतालील कचरा सफाई करून निंदणी करणे,वृक्ष सभोवताल आरे तयार करणे व इतर कामे मजुरांच्या साहाय्याने करण्यात आली आहेत.
३३ कोटी वृक्ष लागवडीची कामे तर करण्यात आली. मात्र सदर केलेल्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी निदर्शनास आले आहे.वृक्ष लागवडीसाठी विविध प्रजातींची लाखो रुपयांची कागदोपत्री रोपे खरेदी करण्यात आली.मात्र खरेदी करण्यात आलेली रोपे कुठे गायब झाली.याचा थांगपत्ताच लागेनासा झाला आहे.कित्तेक साईटवर काही वृक्षे सोडली तर केवळ करंज चीच वृक्षे दिसून येत आहेत.अशातच अंदाजपत्रकामध्ये रोपांच्या सभोवताल कुंपण करणे आवश्यक असता,कुंपण न करताच अनेक देयके काढण्यात आली.तसेच कित्तेक मजुर कामावर न जाता बोगस मजुर दाखवून त्यांच्या नावे प्रमाणके तयार करून अनेकांच्या खात्यांवर रक्कम अदा करण्यात आली आहे.रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कितेक साईटवर जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना सुद्धा जिवंत रोपांची टक्केवारी जास्त दाखवून निधीची मागणी करून शासनाच्या लाखो रुपयांना चुना लावल्या गेले आहे. एवढी मोठी तक्रार असूनही चौकशी करण्याकरिता विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली तर्फे नेमण्यात आलेले वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोलीचे धीरज य.ढेंबरे यांनी सत्यवान रामटेके यांना काल १५ जून २०२३ रोजी प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे की,नेमके कोणत्या कामात काय व किती भ्रष्टाचार याचा उल्लेख नाही.खात्री केलेले ठोस व सबळ पुरावे नाहीत.त्यामुळे मोघम स्वरूपाचे तक्रारीचे चौकशी करणे शक्य होणार नाही; असे ढेंबरे यांचे म्हणणे आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे रामटेके यांनी वारंवार विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण गडचिरोली यांना टपालाद्वारे चौकशी समिती नव्याने गठीत करून त्या समितीचा सदस्य रामटेके यांना करण्यात यावे; असे अनेक पत्रव्यवहार करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पत्रानिशी कळविण्यात यावा; असे कळवूनही विभागीय वन अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे.अशातच अचानकपणे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ पत्रव्यवहार करून अमका आणि ढमका म्हटले जाते; हे कितपत योग्य आहे.चौकशी समिती नव्याने गठीत करण्यात आली असेल तर ‘त्या’ समितीचा अध्यक्ष,सचिव,तांत्रिक अधिकारी,सदस्य व इतर पदाधिकारी कोण? नाहीतर ज्या विभागाची तक्रार ‘त्याच’ विभागाचे कार्यकर्ते. सबळ पुरावे ‘ऑन दि स्पॉट’आहेत.३३ कोटी वृक्ष लागवडीच्या साईटवर चला;त्या-त्या कामांची मोजमाप पुस्तिका,मजुरांचे व्हावचार,रोपे खरेदी,रोपे वाहतूक, अंदाजपत्रक,जिवंत रोपांची टक्केवारी व इतर दस्तऐवज सोबत पकडा; तेव्हा कळेल की ‘मोघम स्वरूपाची तक्रार आहे की जमिनीवर केलेला गोळीबार’ आहे.रामटेके यांच्या मतानुसार हवेत गोळीबार नाही.मात्र तसे न करता ‘चलती का नाम गाडी’ असे केले जात असल्याने कुणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका बळावली आहे.मात्र नुकसान होणार ते ‘जूनं ते नवं’ अशांचेच.आणखी विभागांची छाननी करून कुठे – कुठे जंत्री दडलेली आहे; याचा भांडाफोड करणार असल्याचेही रामटेके यांनी म्हटले आहे.
- Advertisement -