Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसाहेब; रेती मिळेल कां रेती?- घरकुल लाभार्थ्यांची आर्त हाक.....

साहेब; रेती मिळेल कां रेती?- घरकुल लाभार्थ्यांची आर्त हाक…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला ग्रामीण भागातील अनेक घरकुल लाभार्थ्यांची घरे मंजूर होऊन बांधकामे सुरू करण्यात आली आहेत.अशातच मोठ्या प्रमाणावर रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीविना बांधकाम पूर्ण करावे कसे?असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांच्या मनात घर करुन सोडत असल्याने ‘साहेब रेती मिळेल कां रेती’?..अशी आर्त हाक ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

शासन स्तरावरून रेती बाबत अनेक धोरणे आखली जात असली तरीही त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब लागत असल्याने अनेकांना रेतीचा तुटवडा जाणवत आहे.पुढील काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने घरकुलांची बांधकामे ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत.बांधकामे ठप्प स्वरूपात असल्यास पंचायत विभागातर्फे नोटीसा बजावल्या जातात.मात्र हल्ली रेती नसल्याने यांवर तोडगा काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.काही घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यांवर बांधकामाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.तसेच काही घरकुल लाभार्थ्यांनी विटा,सिमेंट,लोहा व इतर साहित्य खरेदी करून ठेवली आहेत.मात्र रेती अभावी बांधकाम सुरू  होणार कधी? असा गहण प्रश्न लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.

काही लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाले म्हणून जुने घर पाडून नवीन बांधकाम सुरू करण्यास सुरुवात केली आहे.पावसाने थैमान घातल्यास रहावे कुठे? अशी अवस्था सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांची झाली आहे.त्यासाठी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेतीसह रेती घाटांची लिलाव प्रक्रिया ताबडतोब सुरू करुन; घरकुल लाभार्थ्यांना दिलासा द्यावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!