- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-होळी सणानिमित्त स्वगावी आलेल्या व स्वगावाहून नागपूरला परत जाणाऱ्या विवाहित दाम्पत्यावर काळाने घाला घातला असल्याची घटना काल,बुधवारी १९ मार्चला नागपूर महामार्गावरील नंदोरी-जाम येथे सकाळच्या सुमारास घडली.भरधाव कार दुभाजकाला धडकली,दुभाजकाला धडकताच कार पलटी झाली.यात अभियंता असलेल्या पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.
मयूर मनोहर बुराण वय ३० वर्षे,रा.गडचांदूर, जि.चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे तर पत्नी रितिका मयूर बुराण वय २८ वर्षे ही गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मयूर बुराण हे नागपूर येथे अभियंता म्हणून कार्यरत होते.नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. होळी सणानिमित्त ते पत्नीसमवेत स्वगावी गडचांदूरला होते.सण साजरा केल्यानंतर दोघेही नागपूरला परत जात असतांना वाटेतचअपघात घडला.अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा पुढील तपास सुरू केला.मयूर यांच्या निधनाने पत्नीने एकच हंबरडा फोडला.मयूर यांच्या पार्थिवावर आज,गुरुवार,२० मार्चला गडचांदूर मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
- Advertisement -