Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरअखेर वाघ शिकार प्रकरणी चार जणांना अटक; मिशा,दात व चार पंजे गायब...

अखेर वाघ शिकार प्रकरणी चार जणांना अटक; मिशा,दात व चार पंजे गायब केल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-खापा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिरोंजी ता.सावनेर शिवारातील भानगाडा नाल्यात गुरुवारी १४ मार्च २०२५ रोजी मृत वाघ आढळून आला होता. मिशा,दात व चार पंजे गायब असल्याने त्याची इलेक्ट्रिक करंटचा वापर करून शिकार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते.या शिकारीच्या तपासात पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिछवा (मध्य प्रदेश) पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती गोळा केली.त्याआधारे पंढरी कुंभरे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली.त्याने गुन्ह्याची कबुली देत इतरांची नावे सांगितली.त्यामुळे पोलिसांनी इतरांना त्यांच्या गावांमधून ताब्यात घेत सर्वांना अटक केली आहे.पंढरी उकंडराव कुंभरे वय ४५ वर्षे,नंदू शंकर भलावी वय ४९ वर्षे,दोघेही रा.सोनपूर, ता.सावनेर, जि.नागपूर,किशोर दौलत भलावी वय ३२ वर्षे,रा. चोरखैरी,ता.सावनेर व छेदीराम घासीराम ठाकूर वय ५७ वर्षे,रा.कुकरीकोता,जिल्हा बलोदा बाजार, छत्तीसगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी शिकाऱ्यांची नावे आहेत.
सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी माणिक कुदरी सिलू वय ४८ वर्षे व राजू मानसिंग दरसामा वय ३५ वर्षे, दोघेही रा.तोरणी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यांनी मागील वर्षी विद्युत तार व बांबूच्या खुंट्यांचा वापर करून वाघाची शिकार करण्यासाठी फासे लावल्याचे तसेच ११ हजार केव्ही क्षमतेच्या तारांवरून वीज वाहून नेण्यासाठी सेंट्रिंगच्या तारांचा वापर केल्याचे सांगितले.हीच माहिती पोलिसांना उपयुक्त ठरली.वन विभागाच्या पथकाने अटकेतील चारही शिकाऱ्यांना मंगळवारी सावनेर शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते.त्यानुसार न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवसांची पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!