- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चिमूर आगाराच्या चिमूर ते नागपूर जाणाऱ्या बसचा बस चालकास अचानक भोवळ आल्याने शहरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामगीता कॉलेजजवळ अपघात झाला.यात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून उर्वरित १६ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.यात चालक सुनील कुसनाके व वाहक बंडू उके यांना दुखापत झाली आहे.
राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,सकाळी १०.१५ वाजता चिमूर आगाराची,चिमूर-नागपूर सुपर बस क्र.एमएच ४० सीएम ४४१८ नागपूरकरिता प्रवासी घेऊन निघाली असता चिमूर येथील ग्रामगीता कॉलेज जवळ बस चालकाला भोवळ आल्याने बस सुरक्षा कटडे तोडून एका बाजूला धावू लागली.बसचा एक चाक बाजूच्या नालीत गेल्याने ती उलटली व रस्त्यावरून अंदाजे १५ ते २० फूट खोल शेतात फरफटत गेली.यावेळी बसमध्ये ४६ प्रवासी होते.यातील १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.एका महिलेला नाकाला मार लागल्याने ती गंभीर आहे.सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यांना रवाना करण्यात आले.अपघात स्थळी डेपो व्यवस्थापक रोशन मेहर,वाहतूक नियंत्रक सूरज मून व यंत्र अभियंता अखिल मिर्झा यांनी परिस्थिती सांभाळली. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली.
अपघाताची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले.वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जखमींना बाहेर काढले व पोलिस उपनिरीक्षक दिप्ती मरकाम यांनी जखमी प्रवाश्यांना पोलिस व्हॅन व अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात उपचारकरिता दाखल केले.
- Advertisement -