Sunday, September 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदोन वेगवेगळ्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद...

दोन वेगवेगळ्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलास मोठे यश आले असून आज,गुरुवारी २० मार्च रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी
झालेल्या चकमकीत तब्बल ३० नक्षलवादी ठार झाल्याने नक्षली संघटनेस मोठा हादरा बसला आहे. अशातच झालेल्या चकमकी दरम्यान एका जवान शहीद झाला आहे.
छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील वनक्षेत्र असलेल्या गंगलूर पोलिस स्टेशन परिसरातील तोडका आंद्री जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक उडाली.चकमकीत बिजापूर डीआरजीचा एक सैनिक शहीद झाला तर चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले.चकमकीच्या ठिकाणाहून २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.तर दुसऱ्या घटनेत छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.सदरच्या दोन्ही कारवाईने नक्षलींना मोठा हादरा बसून नक्षलवादाचा काही अवधीत बीमोड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!