उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर (घोसरी):- पोंभुर्णा तालुक्यातील सेवा सहकारी संस्था, मर्या. फुटाणा येथील सभासदाने पीक कर्जाची मागणी केली असता संचालकांनी प्रकरण प्रलंबित ठेवले.यामुळे सभासदाला कर्जापासून वंचित रहावे लागले.याबाबत सहायक निबंधक एम. डी. मेश्राम यांनी संचालक,अध्यक्ष वासुदेव पाल यांना पदावरून काढले असून त्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
फुटाणा सेवा सहकारी संस्था येथील सभासद नैलेश जोगेश्वर चिंचोलकर यांनी पीक कर्ज प्रकरण सादर करुन बँकेला मंजुरीबाबत विनंती केली होती.परंतु सभासदाच्या आजोबाने ज्या जमिनीवर कर्ज घेतले होते ते कर्ज थकीत असून कर्ज प्रस्ताव बँकेकडे सादर केला नाही.
सभासदाच्या आजोबांच्या मृत्यू पश्चात कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी वारसदार या नात्याने चिंचोलकर यांची आहे.परंतु जमिनीची वाटणी होऊन स्वतंत्र सातबारा दर्शवून कर्जाचा बोजा नाकारणे उचित नाही.
– वासुदेव गोपाळा पाल, संचालक सेवा सहकारी संस्था, फुटाणा