Monday, August 24, 2026
Homeगोंदियागडचिरोली,गोंदिया पोलिस करणार कोम्बिंग ऑपरेशन बलाढ्य सैनिकांसह पिपरखारी येथे एओपी सुरू; नक्षल...

गडचिरोली,गोंदिया पोलिस करणार कोम्बिंग ऑपरेशन बलाढ्य सैनिकांसह पिपरखारी येथे एओपी सुरू; नक्षल प्रभावित क्षेत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया (दरेकसा) : – जिल्ह्यातील गडचिरोली सीमावर्ती भागातील पोलिस ठाणे चिचगड अंतर्गत असलेल्या अतिसंवेदशील नक्षल प्रभावित भागातील पिपरखारी येथे पोलिस विभागाचे मदत केंद्र ( सशस्त्र दूरक्षेत्र) चे ग्रामवासीयांकडून भूमिपूजन व उद्घाटन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक प्रमुख पाहुणे संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महाराष्ट्र शासनास वेळोवेळी वरिष्ठांचे दिशानिर्देश व आदेशान्वये पोलिस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथून पाठपुरावा करण्यात आला होता.पिपरखारी येथे 30 जानेवारी रोजी पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात पिपरखारी गावातील वरिष्ठ, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामवासी पिपरखारी यांच्या हस्ते पोलिस मदत केंद्र (सशस्त्र दूरक्षेत्राचे) भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला गडचिरोली परिक्षेत्राचे पिपरखारी येथे एओपीच्या बांधकामाचे भुमिपूजन करताना पोलीस अधिकारी, पोलिस उपमहानिरीक्षक प्रमुख पाहुणे संदीप पाटील यांनी उपस्थितांना पोलिस मदत केंद्राचे निर्मिती व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच जनसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्व विषद केले. नवनिर्मित पिपरखारी पोलिस मदत केंद्राचे (सशस्त्र दूरक्षेत्राचे) उद्घाटन व भूमिपूजनाप्रसंगी गोंदिया जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सी-६० पथकाचे पोलिस अधिकारी, अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार,पोलिस ठाणे चिचगडचे ठाणेदार, नक्षल सेलचे अधिकारी, कर्मचारी तसेच मंत्रालयीन वरिष्ठ लिपिक विनोद बोपचे, चिचगड, पिपरखारी परिसरातील प्रतिष्ठित वरिष्ठ नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!