Friday, June 19, 2026
Homeभंडारापहिल्यांदा पैसे न देता एकाकडून फ्लॅट खरेदी केला अन् तोच फ्लॅट इतर...

पहिल्यांदा पैसे न देता एकाकडून फ्लॅट खरेदी केला अन् तोच फ्लॅट इतर चौघांना विकला.. – २२ लाख कमावून तब्बल ११ महिने फरार आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या खोकरला येथे आश्चर्यचकित करणारी घटना घडली.एकाने पहिल्यांदा पैसे न देताच दुसऱ्याकडून फ्लॅट खरेदी केला व नंतर तोच फ्लॅट इतर चार जणांना विकून,त्यातून २२ लाख रुपये कमवून तब्बल ११ महिने पसार झाला.त्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.फसवणुकीच्या गुन्ह्यात ११ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.न्यायालयाने त्याला ३ दिवस पीसीआरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सदरचा प्रकार खोकरला,ता.जि.भंडारा येथे घडला असून चेतन लेंडे रा.तकिया वॉर्ड,भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की,आरोपी चेतन लेंडे याने इम्रान कादरी वय ३६ वर्षे रा.भंडारा यांच्या मालकीचा खोकरला येथील फ्लॅट सुमारे ११ महिन्यांपूर्वी त्याच्या नावावर नोंदविला होता.परंतु लेंडे याने कादरी यांना
रक्कम दिली नाही.त्यानंतर लेंडे याने तोच फ्लॅट रोशन रोकडे यांना विकून त्यांच्याकडून १४ लाख रुपये कमावले.लेंडे याने पैसे कमावूनही इम्रान कादरी यांना रक्कम दिलीच नाही.तक्रारदाराचा फ्लॅट त्यांच्या नावावर करून घेतल्यानंतर लेंडे याने फ्लॅटच्या विक्रीसाठी अन्य तीन जणांशी करार करून त्यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले.यासंदर्भात फिर्यादी इम्रान कादरी यांनी भंडारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती.त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करून गत ११ महिन्यांपासून फरार चेतन लेंडे याला ७ डिसेंबरला अटक केली.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी,पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर,पोलिस हवालदार निकेश भैसारे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!