उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न करावे; जे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि चिकाटीने प्रयत्न करातात ते निश्चितच उद्योगात एक मोठी भरारी घेतात.हेच उद्योगातील यशाचे सूत्र आहे.असे प्रतिपादन नगर परिषद देसाईगंजचे माजी उपाध्यक्ष व शहारातील एक प्रसिद्ध व यशस्वी लघु उद्द्योजक मुरलीधर सुंदरकर यांनी विद्यार्थ्यांना संबंधित करतांना म्हटले आहे.ते आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभागाद्वारे आयोजित ‘उद्यमिता दिवस’ कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षाचे प्रभारी डॉ.श्रीराम गहाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निहार बोदेले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेवरच विद्यार्थ्यांची,देशाची आत्मनिर्भरता आणि विकास अवलंबून आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांना ओळखून उपक्रमशीलतेकडे वळले पाहिजे. समस्या हे प्रत्येकाच्या जीवनात असतात.त्या समस्यांना न घाबरता जिद्दीने आणि परिश्रमाने उद्योग विकासाचा ध्यास घ्यावा.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रीराम गहाणे; अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले की,”मनुष्याला त्याचे विचार मोठे बनवतात.जसे विचार मनुष्याचे असतात तो तसाच घडत जातो.जर विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बनण्याची तीव्र इच्छा असेल तर त्या अनुषंगाने त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच माहिती गोळा करणे, उद्योग स्थापना बाबतच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घ्यावी,स्थानिक संसाधनाचा उपयोग करून काय करता येईल याबाबत संशोधक वृत्तीने शोध घ्यावा व स्वयंरोजगारकडे वळावे जेणेकरून विद्यार्थी भविष्यात रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे बनवू शकतात.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा.निहार बोदेले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.अमोल बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार चंदन शिवघरे विद्यार्थ्यानी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.