- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या रेल्वे बोगद्यातील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने शहरातील तसेच परिसरातील नागरिकांना सदरच्या मार्गावरून आवागमन करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रेल्वे बोगद्यातील मार्ग काही अवधीतच उखडल्याने स्थानिक नागरिकांना होत असलेल्या त्रासाची प्रत्यक्ष पाहणी आज,सोमवार ११ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी केली. पाहणीदरम्यान बोगद्यातील मार्गाची दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास येताच आमदार मसराम आक्रमक झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आमदार मसराम यांनी स्पष्ट केले की, “लोकांच्या पैशातून काम केले जात असतांना अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला कधीही सहन केले जाणार नाही.ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.सार्वजनिक सुरक्षेला धोकादायक असे काम करणे हा गंभीर विषय असून,दोषींवर कठोर कारवाई होईल.”
मागील काही महिन्यांपासून या बोगद्याचे काम सुरू असतांना नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.विशेष म्हणजे,काम सुरू असतांना तब्बल पंधरा दिवस बोगदा बंद ठेवण्यात आला होता.त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला होता.यादरम्यान वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील चिखल आणि पाणी साचणे यांसारख्या समस्यांमुळे लोक त्रस्त झाले होते.अश्यातच आता
आमदार मसराम यांनी उद्या,मंगळवार १२ऑगस्ट रोजी देसाईगंज येथे सर्व प्रशासकीय अधिकारी,रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि काम करणाऱ्या ठेकेदारांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.या बैठकीत कामाच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेऊन सुधारणा करण्यासाठी ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.कामाची पाहणी करतांना देसाईगंज तहसीलदार प्रिती डुडुलकर,रेल्वे अभियंता शेंडे,माजी सभापती परसराम टिकले,देसाईगंज काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,गणेश फाफट,राजू रासेकर,माजी उपसभापती नितीन राऊत,सागर वाढई,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर भर्रे,विकास प्रधान,कमलेश बारस्कर,प्रमोद मेश्राम,शैलेश बगमारे,प्रमोद पत्रे,परशुराम ठाकरे,प्रशांत किलनाके, धनपाल आदे,स्वप्निल मिसार, गौरव शिलार, जितू चौधरी,प्रकाश समर्थ,कैलास वानखेडे, संजय करणकर,प्रकाश सांगोडे,उज्जू मेश्राम सह शहरातील नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

