उद्रेक न्युज वृत्त :- ‘मोहब्बत की दुकान’ म्हणविल्या जाणाऱ्या राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत बोगस मतदारांचा चीट्टा उघडपणे जाहीर केल्यानंतर आज,सोमवार ११ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीने दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला.मोर्चात इंडिया आघाडीचे शरद पवार,संजय राऊत,अखिलेश यादव,प्रियांका गांधी,मल्लिकार्जुन खर्गे आदींसह जवळपास ३०० खासदार मोर्चात सहभागी झाले.सदरचा मोर्चा संसद भवन परिसरातून निवडणूक आयोगाच्या मार्गाने जात असतांनाच मोर्चा पोलिसांनी अडविल्याने खासदारांनी ठिय्या मांडला. दरम्यान,पोलिसांनी राहुल गांधी,संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चात इंडिया आघाडीतील २५ घटक पक्ष सहभागी झाले. ताब्यात घेतलेल्या खासदारांना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले.संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत.आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे, ‘एक व्यक्ती एक मत’ यासाठी आमची लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल रविवारी या मोर्चाची घोषणा केली होती.सदर मोर्चाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात न आल्याने दिल्ली पोलीसांनी अडवणूक करून सर्वांना ताब्यात घेतले.यादरम्यान अखिलेश यादव बॅरिकेड्सवर चढून पुढे गेले.प्रियंका गांधी देखील विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत घोषणाबाजी करीत होत्या.
पोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा अडवत राहुल गांधी,प्रियंका गांधी व संजय राऊतांना घेतले ताब्यात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

