- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक(PSI) प्रकाश चौधरी यांच्या हस्ते दिवाळी निमित्त वृध्द परीवारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.चौधरी यांनी दैनंदिन आहारात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये तेल,तिखट,मीठ, हळद,रवा,साखर,तांदूळ,फळे तसेच गोड मिठाई वृध्द परीवारांना देऊन दिवाळी साजरी केली.
पोलिस उपनिरीक्षक चौधरी हे मागील काही महिन्यांपूर्वीच देसाईगंज पोलीस ठाण्यात रुजू झाले.गेली कित्तेक वर्षांपासून ते वृध्द परीवारांना आर्थिक मदतही करीत आहेत.चौधरी हे कुठल्याही पोलीस ठाण्यात कार्यरत असोत,त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या वृध्दांना सांभाळ करणारे कुणीही नाही; अशांना दरवर्षी दिवाळी सणाच्या दिवशी जीवनावश्यक वस्तूंसह गोड मिठाई वाटप करून दिवाळी सण साजरा करीत असतात.अशाच प्रकारे यंदाच्या दिवाळी सणाच्या दिवशी देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंढाळा, कुरुड, शिवराजपुर उसेगाव,फरी,झरी,तुळशी,कोकडी, कसारी व परिसरातील वृध्द परीवारांना जीवनावश्यक वस्तू, फळे व गोड मिठाई वाटप करून वृध्द परिवारांचा आनंद द्विगुणित केला.पीएसआय चौधरी हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आहेत.ते नेहमी इतरांना सांगत असतात की,या जीवनामध्ये काय ठेवला आहे; कधी काय होणार,हे तुम्हा-आम्हालाही माहीत नाही; आपण एखाद्याच्या दुःखात सहभागी जरी झालो नसलो, तरीही त्यांना क्षणिक देणारे सुख हे संपूर्ण दुःख विसरायला लावत असते.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रसंगी कोंढाळा गावाचे सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, वृध्द पार्वता कुमरे,शंकर पारधी,महिनाबाई माकडे व तालुक्यातील वृध्द कुटुंबीय उपस्थित होते.
- Advertisement -

