उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- गजानन महाराज मंदिर परिसरात काल १५ सप्टेंबर २०२३ रोजी आबालवृद्ध समवेत मान्यवरांच्या उपस्थितीत तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
युवा समिती माता वार्डच्या वतीने गजानन महाराज मंदिर परिसरात तान्हा पोळा निमित्त भव्य वेशभूषा व नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व बालगोपाल यांना भेट वस्तू,नोटबुक्स व प्रसादीचे वाटप करण्यात आले.देसाईगंज येथील कमलाबाई अग्रवाल यांनी सुरू केलेली गेली ५८ वर्षापासूनची परंपरा आजही कायम राखून तान्हा पोळा साजरा करण्यात येत आहे.तान्हा पोळा साजरा करतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन वानखेडे,माजी नगराध्यक्ष श्याम उइके,विलास लोखंडे,अजय सहारे,मनोहर भुर्रे,दिलीप अग्रवाल,कृष्णा भंडारकर,सुधाकर राऊत,मनोज भूर्रे, नानू मेश्राम,अनिल फडणवीस,चेतन डांबरे,अमोल पत्रे, बादल रहाटे,प्रकाश वानखेडे,गणेश दोनाडकर, आशिस मंगर,ब्रम्हदास आकरे,गणेश बुराडे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच विविध वार्डातील बालगोपाल उपस्थित राहून नंदीबैल आणि वेशभूषा करून गजानन महाराज परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

