देसाईगंज :- आमआदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवनी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपचे पदाधिकारी यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून देसाईगंज आम आदमी पक्षाच्या पक्ष प्रवेशाला जनतेकडून पसंती दिली जात आहे.दररोज नवनवीन कार्यकर्त्यांचा आपमध्ये प्रवेश होतांना दिसून येत असल्याने देसाईगंज आम आदमी पक्षाची ताकद वाढतच चालली आहे.पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आम आदमी पक्षामुळे दमछाक होण्याची शक्यता बळावली आहे.
पक्ष प्रवेशाला जनतेकडून दिल्या जाणाऱ्या पसंतीमध्ये आज २१ जानेवारी २०२३ रोजी स्वर्गीय आमदार नारायणसिंग उइके यांचे कट्टर समर्थक बाळकृष्ण भंडारकर व गजानन अलिवार यांनी आम आदमी पार्टी देसाईगंज कार्यालयात पक्षाची टोपी घालून पक्ष प्रवेश केला आहे.
पक्ष प्रवेश करतेवेळी आम आदमी पक्षाचे देसाईगंज तालुका संयोजक भरत दयलानी,दीपक नागदेवे, व पक्षाचे कार्यकर्ते अतुल ठाकरे,नाजुक लूटे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.