- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-संविधान दिनाचे औचित्य साधून आज,मंगळवारी २६ नोव्हेंबरला देसाईगंज शहराच्या मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाविद्यालयाचे डॉ.सुनिल चौधरी यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ.आशिष सेलोकर यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की, ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्वात मोठी घटना म्हणजे संविधानाची निर्मिती मानली जाते.संविधान ही देशाची ओळख आहे.देशाची राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो.ते देशाच्या राजकीय व्यवस्थेची व्याख्या करते.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना मंजूर झाली,म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो’.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता उद्देशिकीचे वाचन करुन करण्यात आली.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -