Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरदारूचे व्यसन सोडण्याचे औषध घेतल्याने दोन तरुणांचा मृत्यू…

दारूचे व्यसन सोडण्याचे औषध घेतल्याने दोन तरुणांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज 

चंद्रपूर :- जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. दारूचे व्यसन सोडण्याचे औषध घेतल्याने गुडगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला.तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.व्यसन सोडण्यासाठी घेतलेल्या औषधानेच जीव गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सहयोग सदाशिव जीवतोडे वय १९ वर्षे,प्रतीक घनश्याम दडमल वय २६ वर्षे राहणार गुळगाव,अशी मृतकांची नावे आहेत तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे वय ४५ वर्षे व सोमेश्वर उद्धव वाकडे वय ३५ वर्षे या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,हे चारही मद्यपी गुडगाव येथील असून मद्यपी वर्धा जिल्ह्यातील जाम जवळच्या शेडगाव येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी गेले होते.महाराजांनी त्यांना दारू सोडण्याची औषध दिली.त्यानंतर ते आपल्या स्व: गावी परत आले.गावी परतल्या नंतर चौघांचीही प्रकृती बिघडली.प्रकृती बिघडताच लगेच भद्रावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.यामध्ये सहयोग आणि प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला.तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!