Friday, June 19, 2026
Homeभंडाराजप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी दोन हजारची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर...

जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी दोन हजारची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अपघातप्रकरणी पोलिस ठाण्यात जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई आज,   १९ सप्टेंबर रोजी वरठी पोलिस ठाण्यात करण्यात आली.राजेश सदाशिव बाभरे वय ५६ वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचा मालकीचा टिप्पर असून ते रेतीची वाहतूक करतात.त्यांच्या टिप्परचालकाविरुद्ध वरठी पोलिस ठाण्यात १ सप्टेंबर रोजी अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा टिप्पर पोलिस ठाण्यात जप्त करुन ठेवण्यात आला होता.दरम्यान,टिप्पर सोडविण्यासाठी वरठी पोलिस ठाण्याचे कर्मचारी पाच हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार ६ सप्टेंबर रोजी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
त्याच दिवशी या तक्रारीची पडताळणी केली असता वरठी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश बाभरे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडअंती दोन हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.त्यानंतर १३ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर रोजी सापळा कारवाईदरम्यान राजेश बाभरे यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही.याप्रकरणी त्यांच्याविरोधात वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार,पोलिस निरीक्षक अमित डहारे,संजय कुंजरकर,पोलिस हवालदार मिथुन चांदेवार,अतुल मेश्राम,अंकुश गाढवे, शिलपेंद्र मेश्राम,नरेंद्र लाखडे,चेतन पोटे,मयूर शिंगणजुडे,राजकुमार लेंडे,विवेक रणदिवे,राहुल राऊत,अभिलाषा गजभिये यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!