उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/चंद्रपूर विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील कोळशी येथे ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा करून संपन्न झाला.कोळशी ग्रामवाशिय जनता अविरत पंधरा वर्षांपासून विवाह सोहळ्याची पंरपरा जोपासित आहेत.सदर विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता संपूर्ण विवाह मोफत लावल्या जातो.
आजच्या घडीला अनेक विवाहांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते.मात्र अनेक सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांकडे पैस्या अभावी विवाहास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.अशातच हीच परिस्थिती लक्षात घेता गावागावात सुख शांती प्रस्तापित होण्याच्या दुष्टीने सर्व थोर महापुरुष व संताच्या जयंतीचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अंतीम इच्छेनुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिडीला मानवधर्ममाचा विश्वशांतीचा व बंधुत्वाचा दिव्य संदेश देण्याचा साधूसंत व महापूरुषाचा कार्यकर्तुंत्वाचा जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी या निमित्ताने ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्त कार्यक्रमात विवाह सोहळा ठेवण्यात आला.यामध्ये कोळशी गावातील युवक तरुण पुढे येऊन असे विविध कार्यक्रम गावात राबवित असतात. विवाह सोहळ्यामध्ये परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठया संखेने पार पाडण्यात आला.
सदर मेळाव्यात तीन विवाह पार पडले असून विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमललीत पारधी,ग्रामगीतार्चाय घुग्गुसचे नंदकीशोर वाढई,सरपंच संघटनेचे कालिदास चेडे,मीनाथ महाराज नारायण झाड,उमेश कोल्हे,दिलीप दोरखंडे,पांडुरंग जरीले, किलनाके महाराज आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती.