उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अनवधानाने कुलरला हात लागल्याने करंट लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवारी दि.२ जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे घडली.आशा भाष्कर चौधरी वय ४६ वर्षे रा.मोहरणा असे मृत महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,आशा या मंगळवारी सकाळी स्वयंपाक करतो म्हणून कुलरवर ठेवलेल्या टोपलीतून भाजीपाला काढण्याकरिता गेल्या; दरम्यान चालू कुलरच्या पाण्याच्या टाकीला हात लागल्याने करंटलागला.करंट लागताच त्या ओरडल्या.त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आशा यांच्या पतीने जाऊन बघितले.तेव्हा त्या कुलरच्या पाण्याच्या टाकीला चिकटून होत्या.त्यामुळे त्यांनी कुलरचे बटण बंद करून आशा यांना कुलरपासून दूर केले व जमिनीवर झोपवले.तात्काळ गावातील डॉक्टरांना बोलावले.मात्र,तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.