Monday, June 22, 2026
Homeगडचिरोलीमधमाशा पालनासाठी ५० टक्के अनुदान...

मधमाशा पालनासाठी ५० टक्के अनुदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) राबविली जाते.यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान,शासनाच्या हमी भावाने मध खरेदी,विशेष प्रशिक्षणाच्या सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.यातील वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.स्वता:ची शेती असल्यास प्राधान्य,वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.तर केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजनेसाठी लाभार्थी वैयक्तिक स्वरुपाचा असावा,किमान १० वी उर्त्तीण असावा.२१ वर्षापेक्षा जास्त वय असावे.अशा व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन असावी.लाभार्थीकडे मधमाशापालन,प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी.संस्थेच्या नावे किंवा १० वर्षासाठी भाडेतत्वावर किमान १ एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे.१ हजार चौरस फुट इमारत असावी. सदर योजनेचे प्रशिक्षण अर्ज करण्यासाठी मंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,जिल्हा उद्योग केंद्र भवन,कोटगल रोड, गडचिरोली येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी मुलकलवार मधुक्षेत्रिक मो.क्रं. 9422628050 यांच्याशी संपर्क साधावा.तरी जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती...

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!