उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कुरूड (देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुड येथील गौरव विलास पिलारे हे काल दिनांक -१० ऑक्टोंबर २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा दौड स्पर्धेत जिल्हातून प्रथम आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा व त्यांना ज्या क्षेत्रात आवड असते; अशा क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घ्यावी; यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थी वर्गांची दखल घेतली जाते.अशाच प्रकारे काल दिनांक – १० ऑक्टोंबर २०२३ रोजी गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील १०० मीटर दौड स्पर्धेत कुरूड येथील राधेश्याम बाबा विद्यालय येथील कु.गौरव विलास पीलारे याने गडचिरोली जील्हातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.गौरव यांचे वडील विलास पिलारे हे कुरुड ग्रामपंचायतीचे सदस्य असून गौरव याने विजयाचे श्रेय आई,वडील व शाळेतील मुख्याध्यापक तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांना दिले आहे.