Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीमुलाची हत्या करणाऱ्या भन्ते भगीरथ यांना अटक करा…-आईने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे (SP)...

मुलाची हत्या करणाऱ्या भन्ते भगीरथ यांना अटक करा…-आईने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे (SP) तक्रार केली दाखल…देसाईगंज येथील मुलाचे गूढ रहस्य…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- मागील समापण सोहळाच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बुद्ध विहार कोठरीतील (जंगल परिसर) येथील अवैध वास्तव करणारे भन्ते भगीरथ यांनी माझा मुलगा तक्ष याला काठीने मारहान करीत ‘साल्या तु बदमास आहेस’ असे म्हणीत त्याच्या मागे धावला व तक्ष नाल्याच्या पाण्यात पडून बुडून मृत्यु पावला.तरीही ‘मरु दे साल्याला,बदमास आहे; असे म्हणीत त्याला मदत केली नाही.माझ्या मुलाच्या मृत्युला भन्ते भगीरथच जबाबदार आहे. याला त्वरीत अटक करावी;अश्या मागणीची तक्रार काल दिनांक- १० ऑक्टोंबर २०२३ रोजी तक्षच्या आईने पोलीस स्टेशन घोट व जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांना दिली आहे. 

दिलेल्या तक्रारीत व मयत तक्ष च्या आईने म्हटले की,माझा मुलगा तक्ष हा नागपूर येथे ७ वीत शिकत होता.भन्ते भगीरथ यांनी माझी परवानगी न घेता त्याला फुस लावून श्रामनेर बनवतो म्हणुन बुद्ध विहार कोठरीत आणले व त्याला १० दिवसांसाठी श्रामणेर बनविले.तरीही याची पुसटसी कल्पना मला दिली नाही.भन्ते भगीरथ याच्या मारहानी मुळे माझा मुलगा मरण पावला.तक्ष याला चोरुण आणणाऱ्या भन्ते भगीरथ व मुख्याधापक नागपूर या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करावी; अशीही मागणी तक्ष च्या आईने केली आहे.बौध्द विहार कोठरी समापण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला भन्तेने केलेल्या मारहानीमुळेच पाण्यात बडुन मृत्यु झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदार त्या ठिकाणी उपस्थित होते.तक्ष चे प्रेत सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आणून भन्तेनी शवविच्छेदन करायला लावले.तसेच माझ्या पतीला आमिष दाखवून प्रेत देसाईगंज (वडसा) येथे आणुन शवविच्छेदन केलेल्या प्रेताचा पुरावा नष्ट व्हावा; म्हणुन अर्ध्या रात्रीच वैनगंगा नदीघाटावर भन्तेनी तक्ष चे प्रेत जाळले व तक्रार करू नका;असे आमच्या कुटुंबीयांना सांगीतले.तक्ष च्या आईचे व साक्षीदाराचे बयान बाकी घेणे बाकी असून बयान झाल्यानंतर सत्य परिस्थितीचा उलगडा होणार असल्याने याकडे सर्व जनता-जनार्दन यांच्या नजरा भिडलेल्या आहेत.भन्ते भगीरथ,कोठरी यांना त्वरीत अटक करावी; अशी मागणी तक्षची आई देसाईगंज (वडसा) हिने तक्रारीद्वारे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!