Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीएकाने गळफास घेतला तर एकाचा करंट लागून मृत्यू.. - आरमोरी तालुक्यात एकाच...

एकाने गळफास घेतला तर एकाचा करंट लागून मृत्यू.. – आरमोरी तालुक्यात एकाच दिवशी मृत्यूच्या दोन घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या 
आरमोरी तालुक्यात एकाच दिवशी मृत्यूच्या दोन  घटना घडल्या असून पहिली घटना सकाळच्या सुमारास घडली तर दुसरी घटना दुपारच्या सुमारास घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहिली घटना आरमोरी तालुक्याच्या इंजेवारी येथे घडली. इंजेवारी येथील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.गजानन नामदेव लाकडे वय ५५ वर्षे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.लाकडे हे काल गुरुवारी सकाळच्या सुमारास घराबाहेर पडले होते. दरम्यान,गावालगत असलेल्या जंगल परिसरातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.लाकडे यांची काही शेती रेल्वे प्रकल्पात गेली होती.तर उर्वरीत शेतात त्यांनी धानाचे पीक हाती घेतले होते.मात्र,अतिवृष्टीमुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते.याच चिंतेत त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
दुसरी घटना आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे उघडकीस आली.काल गुरुवारी दुपारच्या सुमारास विजेचा धक्का बसल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.निखिल पुरुषोत्तम नारनवरे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.दुपारी घरी अंघोळ करत असतांना वीज चालू-बंद होत होती.त्याने हात ओले असतांनाच
विजेच्या बोर्डवरील बटन हाताळले.यात त्याला विजेचा तीव्र धक्का बसून तो जागीच कोसळला.त्याला तात्काळ आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले,मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.निखिलने दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते.तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.अश्यातच काळाने झडप घातली.दोन्ही घटनेत आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!