Wednesday, October 21, 2026
Homeनागपूरकर्मचारी ठरला डिजिटल अरेस्टचा बळी; दीड कोटीला चुना..

कर्मचारी ठरला डिजिटल अरेस्टचा बळी; दीड कोटीला चुना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ऑनलाईन फसवणूक ही अनेकांची डोकेदुखी ठरू लागली आहे.त्यामुळे बरेच लोकं फोन  पे,गूगल पे व इतर ऑनलाईन व्यवहार करण्याचे टाळत असतात. त्यातच,काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टमुळे अनेकांना कोट्यवधी रुपये गमवावे लागले आहेत.यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत डिजिटल अरेस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. अश्यातही अनेकजण डिजिटल अरेस्टचे बळी पडू लागलेत.अश्याच प्रकारे एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला
डिजिटल अरेस्ट करत तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.८० वर्षीय पीडित व्यक्ती टपाल विभागातून निवृत्त झाले असून ते आता झारखंडमध्ये राहतात.मात्र,नागपुरात त्यांचे येणे-जाणे असते व मुलगादेखील नागपुरातच राहतो.या महिन्यात ते नागपुरात आले असतांना त्यांना सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क केला.खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्यांनी पैसे मागितले.२७ ऑक्टोंबर रोजी सायबर फसवणूक करणाऱ्यांनी डिजिटल अटकेची धमकी देऊन ३२ लाख रुपये उकळले.त्यानंतर निवृत्त व्यक्तीने चार बैंक खात्यातून एकूण दीड कोटी रुपये गुन्हेगारांनी सांगितलेल्या खात्यात वळते केले.आश्चर्याची बाब म्हणजे,त्यांनी एका वित्त कंपनीत २५ लाखांचे सोनेदेखील गहाण ठेवले. गुन्हेगारांनी त्यांच्यावर अधिक पैसे देण्यासाठी दबाव आणला.त्यांनी मुलाला कर्जासाठी मदत मागितली तेव्हा त्यांच्या मुलाला संशय आला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.त्यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांना गुन्हेगारांच्या बँक खात्यातून आतापर्यंत २५ लाख रुपये गोठविण्यात यश आले आहे.मात्र,कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!