Tuesday, July 21, 2026
Homeमुंबईन्यायालयाचे जज आणि लीपिकाची करामत; मागितले २५ लाख अन् स्वीकारले १५ लाख..

न्यायालयाचे जज आणि लीपिकाची करामत; मागितले २५ लाख अन् स्वीकारले १५ लाख..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-भ्रष्टाचाराने सर्वत्र उच्छाद मांडलेला आहे. अश्यातच आता न्यायालयातही भ्रष्टाचाराने एंट्री केल्याने खरोखरच न्याय उरलेला आहे काय?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.जनतेनी विश्वास ठेवावा तरी कुणावर?असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे न्यायालयात तुमच्याच बाजूने निकाल लागेल,हे सांगणे कठीण आहे भावा.चक्क न्यायालयाचे जज आणि लीपिक मिळून निकाल तुमच्याच बाजूने देणार असल्याची बतावणी करून तक्रारदार यांना २५ लाख रुपयांची मागणी करून १५ लाख रुपये स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना मुंबईच्या माझगांव येथील दिवाणी सत्र न्यायालय कोर्ट क्र.१४ येथे उघडकीस आली आहे.प्रकरणी चंद्रकांत हनमंत वासुदेव वय ४० वर्षे,पद-लिपीक/टंकलेखन,सिटी सिव्हील कोर्ट, माझगांव,मुंबई व एजाजुददीन मलाउददीन काझी वय ५५ वर्षे,पद-अतिरिक्त सत्र न्यायाधीश,दिवाणी सत्र न्यायालय,कोर्ट क्र.१४ माझगांव,मुंबई यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७(अ),१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व  न्यायालयात हजर केले असता सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने मागणी मान्य करत वासुदेव यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.तर न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांचा तपास सुरू असून त्यांच्या अटकेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसीबीने दिलेल्या प्रेस नोटनुसार,तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे कंपनी होती.मात्र,कंपनीच्या जागेचा ताबा तिसऱ्याच व्यक्तीने घेतल्याने याविरोधात तक्रारदार यांच्या पत्नीने सन २०१५ मध्ये उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली होती.त्यानुसार, २७ एप्रिल २०१६ रोजी उच्च न्यायालयाने नमूद जागेच्या थर्ड पार्टी राईट्स निर्माणीला स्थगिती दिली होती.तसेच उच्च न्यायालयाने ज्या केसेस १० कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या आहेत,त्या सर्व केसेस दिवाणी सत्र न्यायालय येथे वर्ग केल्या होत्या. त्याचबरोबर,उच्च न्यायालयाने मार्च २०२४ रोजी नमूद केसमध्ये दिवाणी सत्र न्यायालय,माझगांव, मुंबई येथे कर्मशियल सूट म्हणून वर्ग केले होते.त्यानुसार, ९ जानेवारी २०२५ रोजी तक्रारदार यांच्या कार्यालयातील सहकारी हे दिवाणी सत्र न्यायालय,कोर्ट क्र.१४ येथे हजर होते.त्यावेळी वासुदेव यांनी तक्रारदार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष भेटून बोलायचे असल्याचे  सांगितले.त्यानुसार,लिपिक वासुदेव यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी स्टारबक्स कॅफे,चेंबूर येथे जावून भेट घेतली असता चंद्रकांत वासुदेव यांनी केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने पारीत करण्याकरीता २५ लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील १० लाख  त्यांना व उर्वरीत १५ लाख रुपये जज(न्यायाधीश) यांचेकरीता असे सांगितले. तक्रारदार यांनी एवढी रक्कम देण्यास नकार दिला असता,विचार करून सांगा,असे वासुदेव यांनी सांगितले. त्यानंतरही लिपिक वासुदेव हे तक्रारदार यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करू लागले,परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोमवार १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी,मुंबई येथे तक्रार दिली.नमूद तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानुसार,चंद्रकांत वासुदेव यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या कामाकरीता तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले आणि मंगळवार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान चंद्रकांत वासुदेव यांना तक्रारदार यांचेकडुन लाचेची रक्कम १५ लाख रुपये स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर  चंद्रकांत यासुदेव यांनी एजाजुददीन सलाउददीन काझी,अतिरिक्त सत्र न्यायाधीश,दिवाणी सत्र न्यायालय,कोर्ट क्र.१४, माझगांव,मुंबई यांना कॉल केला आणि रक्कम स्विकारलेबाबत सांगितले असता,त्यांनीदेखील त्यास संमती दर्शवली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई तपास अधिकारी श्रीमती सुनित दिघे,पोलीस निरीक्षक पर्यवेक्षक अधिकारी प्रविण नावडकर,सहाय्यक पोलीस आयुक्त,मार्गदर्शन अधिकारी संदीप दिवाण,अप्पर पोलीस आयुक्त,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई,अनिल तुकाराम घेरडीकर,अप्पर पोलीस उप आयुक्त,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई राजेंद्र गणपत मांगळे,अप्पर पोलीस उपआयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!