Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीमुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमध्ये 'सोलर शाळा' उपक्रम..

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सोलर शाळा’ उपक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि प्रसिद्ध अंबानी उद्योगसमूहातील सदस्य व ‘रोझी ब्लू फाउंडेशन’च्या संचालिका श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून नक्षलग्रस्त व दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौरऊर्जीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
‘कनेक्ट फॉर’च्या संस्थापक श्रीमती श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक श्रीमती मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे,अशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती.त्याला अनुसरून देशातील अग्रगण्य अंबानी उद्योगसमूहातील सदस्या श्लोका अंबानी यांनी नीती आयोगाने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोझी ब्लू फाऊंडेशन आणि त्यांच्या स्वयंसेवा प्लॅटफॉर्म ‘कनेक्ट फॉर’च्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सोलर शाळा प्रकल्पाअंतर्गत
रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास मंजुरी दिली.
पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौरऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला.यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा,मुसक्या,सालेभट्टी, रांगी,निमगाव,दुडमला,मुरूमगाव,बन्धोना, तसेच जि.प. हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.या प्रकल्पामुळे शाळांमधील अध्यापन व डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना वीजपुरवठ्यावरील अवलंबन कमी होऊन अखंड सुविधा मिळेल व या शाळांमधील सुमारे १ हजार ४७० विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्लोका अंबानी यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू झालेला ‘सोलर शाळा प्रकल्प’ हा गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणप्रणालीसाठी टिकाऊ, स्वच्छ आणि विश्वसनीय ऊर्जा पुरविणारा नवा आदर्श ठरणारा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!