Thursday, September 10, 2026
Homeगोंदियाअजब कर्मचाऱ्याची गजब कहाणी..! नायब तहसीलदार पदावरून जो कोसळला; तो थेट तलाठी...

अजब कर्मचाऱ्याची गजब कहाणी..! नायब तहसीलदार पदावरून जो कोसळला; तो थेट तलाठी पदावर पोहचला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-तुम्ही कितीही लुकाछुपीचे खेळ करा,पण ज्या दिवशी तुमच्या करून कहाण्यांचे घडे भरले, त्यादिवशीपासून तुमच्या विनाशकारी जीवनाची सुरुवात होऊन शेवट झाल्याशिवाय राहणार नाही.अश्याच प्रकारचे प्रकरण गोंदिया तहसील कार्यालयात उघडकीस आले आहे.विशेष म्हणजे,तलाठी पदावरून झालेली बढती थेट नायब तहसिलदारापर्यंत पोहचली खरी; पण कुणाची तरी नजर लागल्याने परत नायब तहसिलदार पदावरून पूर्वपदावर म्हणजेच तलाठी पदावर समाधान मानावे लागले आहे.ही घटना गोंदिया तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार प्रकाश बसंतकुमार तिवारी यांच्या बाबतीत घडली असून त्यांनी खोटी माहिती व खोट्या कागदपत्रांच्या आधारे नायब तहसिलदार पद मिळवल्याचा ठपका ठेवत राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाच्या महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी आदेश काढून तिवारी यांना पूर्वपदावर राहण्याचे फर्मान सोडले आहे.
तिवारी यांनी खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे पदोन्नती घेतल्याची बाब समोर येताच गोंदिया अप्पर तहसील कार्यालयातील तलाठी जी.बी.हटवार यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती.तक्रारीच्या अनुषंगाने याची चौकशी करण्यात आली.चौकशीत तिवारी यांनी महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाली नसल्याची बाब व खोट्या कागदपत्रांच्या आधारे पदोन्नती मिळविली असल्याचे निष्पन्न झाले.त्यांच्या महसूल अर्हता परीक्षेबाबत सेवापुस्तकात चुकीची नोंद घेण्यात आल्यामुळे त्यांना मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार पदावर देण्यात आलेली पदोन्नती त्वरित रद्द करून तिवारी त्यांना तलाठी संवर्गात नियुक्त करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!