- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-देशात संत्रानगरी म्हणून प्रसिद्ध आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या मोरभवन येथील ‘विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या अर्पण सभागृहात साहित्य अर्चन मंच,नागपूरच्या वतीने नुकतेच झाडीपट्टीतील नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्य अर्चन मंच,नागपूर या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते.यात पाच विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल तसेच २० हिंदी आणि मराठी साहित्यिकांना उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी पुरस्कृत करण्यात येते व विजेत्या साहित्यिकांना वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी संपूर्ण भारत देशातून १६३ साहित्यिक यांनी सहभाग नोंदविला होता.त्यात मराठी साहित्य प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाटकास यंदाचा नाट्यलेखनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिंदी साहित्य संघात झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोविंदप्रसाद उपाध्याय(आयुर्वेदाचार्य तथा संपादक पावन परम्परा, डॉ.वेदप्रकाश मिश्रा(माजी कुलपती,श्रीकृष्ण स्वास्थ्य विश्वविद्यालय,कराड),श्री स्वामी निर्मलानंद महाराज (अध्यक्ष,गीता मंदिर, नागपूर)व विशेष अतिथी प्रा.डॉ.प्रमोद गिरी(संचालक,न्युरान हॉस्पिटल),डॉ.विवेक लंजे(प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ)यांचे हस्ते साहित्य अर्चन मंचचे अध्यक्ष डॉ.शशिकांत शर्मा व सचिव नरेंद्र परिहार ‘एकांत’ इ.मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र व सन्मानपत्र असे आहे.नुकताच चंद्रपूर येथील प्रियदर्शनी हॉल मध्ये राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवात या नाटकाचा प्रयोग सादर झालेला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन १९९३ चा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आजपर्यंत त्यांची विविध १५ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.
महामृत्युंजय मार्कंडेश्वर,महापूजा,बहूढंगी समाधीवाले बाबा,स्पेशल रिपोर्ट,धरती आबा:क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,यादव गव्हाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा. डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,डॉ.दिपक चौधरी,रमेश निखारे,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक) मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक)सह इतर साहित्यिक तथा कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
- Advertisement -

