Saturday, August 29, 2026
Homeआरमोरीआरमोरी तालुक्यात जंगली हत्तींच्या कळपाने मांडला उच्छाद -जीवनावश्यक साहित्यांसह,शेतपिकांचीही नासधूस…

आरमोरी तालुक्यात जंगली हत्तींच्या कळपाने मांडला उच्छाद -जीवनावश्यक साहित्यांसह,शेतपिकांचीही नासधूस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- मागील काही दिवसांपासून आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत हत्तींचा संचार कायम असून रविवारी किर्रर्र रात्री जंगली हत्तींच्या कळपाने पाथरगोटात हैदोस घालित गावातील पाच घरे नेस्तनाबूत केली.यादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हत्तींनी घरातील साहित्यांसह धान, तांदळासह शेतातील पिकांचीही नासधूस केल्याने पाथरगोटासह परिसरातील नागरिकांमध्ये हत्तींची दहशत कायम आहे.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात उच्छाद मांडणाऱ्या २० ते २४ संख्येत असलेल्या रानटी हत्तींनी गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.मात्र आठवड्याभरातच हत्तींनी परत कुरखेडा तालुका हद्दीतून जिल्ह्यात प्रवेश केला. प्रारंभी देसाईगंज तालुक्यातील शंकरपूरसह परिसरात उच्छाद मांडणाऱ्या हत्तींनी आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावाकडे वळविला.जंगल परिसराला लागून असलेल्या पाथरगोटा येथे हत्तींनी रविवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास प्रवेश करीत उच्छाद मांडल्याने हत्तींच्या या आक्रमक स्वभावाचे पाथरगोटा वासीयांना पुन्हा दर्शन घडले. रानटी हत्तींनी गावातील अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगल प्रधान, चंद्रशेखर बगमारे, दुर्गादास बगमारे यांच्या घरावर हल्ला चढवित घरांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.वेळीच कुटुंबीय घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान हत्तींनी घरातील धान,तांदूळ,अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्यांची प्रचंड नासाडी केली.यात संबंधितांचे प्रचंड नुकसान झाले असून अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून ते बेघर झाले आहेत.घटनेची माहिती आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांना मिळताच सोमवारी सकाळीच वनविभागाचे पथक गावात रवाना करण्यात आले.आरएफओ मेश्राम यांच्या नेतृत्वात क्षेत्र साहाय्यक किनेकर,वनरक्षक अतकरे,एफडीसीएम क्षेत्र साहाय्यक शिऊरकर, वनरक्षक अनिता लट्टाये,पंढरी,तेलंग,गजानन ठगे, सुधाकर राठोड आदींसह वनविभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 

अविनाश मेश्राम,वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी👇

पथकाद्वारे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. हत्तींद्वारे ३ ते ४ घरांची पडझड करण्यात आली आहे. तसेच जीवनावश्यक साहित्यांसह नासधूस झाली आहे.गावालगतच्या काही शेतपिकांचेही नुकसान झाले आहेत.सद्यस्थितीत हत्ती पाथरगोटा-पळसगाव- डोंगरगाव परिसरात संचारत असून कळपावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाचे पथक गस्तीवर आहेत. तसेच हुल्ला पार्टीचे पथकही यासाठी सज्ज असून हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!