Friday, August 28, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी; गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या....- देसाईगंज तालुक्यातील आजची घटना...

मोठी बातमी; गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या….- देसाईगंज तालुक्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असल्याने गावात शंका-कुशंकेला उधाण आले आहे.सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील आमगाव-देसाईगंज मुख्य मार्गावरील बैद्यनाथ कारखाना नजिक असलेल्या धोडी नाला जवळच आज सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास मार्गावरून ये-जा करणाऱ्या  काही नागरिकांना एक इसम झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यामुळे सदर घटना ही वाऱ्यासारखी पसरली व बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यानुसार गांधीनगर येथील चक्रधर बनकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेले नरेश नामदेव पारधी वय ३५ वर्षे रा.गांधीनगर, यांचे मोठे बंधू मारोती नामदेव पारधी यांना सदर घटनेची माहिती दिली.त्यानुसार मारोती पारधी यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास कळताच लगेच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला व मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करीत आहेत.सदर तरुणाने घेतलेला गळफास गुलदस्त्यात असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची चर्चा जनमाणसात सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!