उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- पासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव येथील तलावास रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासंदर्भात २७ जानेवारी २०२३ देसाईगंज पंचायत समितीचे बिडीओ यांच्या मार्फतीने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम आदमी पक्ष देसाईगंजच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की,आमगाव येथे दरवर्षी मोठ्या संख्येने रामनवमीची जत्रा भरत असते.जत्रा ही तलावा जवळपास भरीत असल्याने तलावातील संपूर्ण पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गाळ साचली असल्याने तलावाचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.रामनवमीची जत्रा भरीत असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून तलावाचे सौंदर्यीकरण करून तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा व तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे.अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.