उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- दिवसेंदिवस वय वाढत चालली,किती मुली बघितल्या; परंतु एकही पसंत करीत नाही.अशी अनेक युवकांकडून आपबिती सांगितली जाते आहे.अशातच मुलींचीही डिमांड वाढली असल्याने काय करावे? तरुणांना सुचेनासे आहे.सुशिक्षित बेरोजगारांची संख्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढत चालली आहे.ग्रामीण भागातील मुलीही आता शासकीय नोकरी वाल्यांना पसंती देत आहेत.काही भागात तर सुशिक्षित मुले वय होवूनही अविवाहीत आहेत.शासकीय नोकरी नसल्याने पत्ताच कट केला जात आहे.शेती असून शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणे कठीण जात आहे.
मुलीचीच नव्हे तर वधूपित्याची पहिली पसंती शासकीय नोकरीतील मुलांनाच अधिक आहे.त्या खालोखाल खाजगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मुलांना अधिक पसंती दिली जाते.मात्र शेतकरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना मात्र मुलगी मिळणे आधुनिक युगात कठीण झाले आहे.काही तरूण बिना हुंड्याने विवाह करायला तयार आहेत.परंतू वधूपिता मुलगी द्यायला तयार नाही.पूर्वीच्या काळात हुंडा व मुलगी अनेकांना मिळत होती.परंतू आधुनिक काळात त्यात बदल झाला आहे. त्यामुळेच वधूपिता आपली मुलगी सुखाने राहावी, यासाठी शासकीय नोकरीवर असलेला जावई शोधत आहेत.गावागावातच आता वरासाठी वधू शोधन्याचे काम सुरू आहे.परंतू जो-तो वधूपिता शासकीय नोकरी असणाऱ्यांनाच प्राधान्य देत आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा भाव लग्नाच्या बाजारात घसरलेला आहे.चार ते दहा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळणे कठीण जात आहे. एव्हढेच नव्हे तर मामा सुद्धा शेतकरी असलेल्या भाच्याला मुलगी देणे नापसंत करीत आहेत.त्यामुळे लग्नाळू मुलांना मुली मिळणे कठीण जात आहे.त्यामुळे शेतीत राबायचे की नाही? असा प्रश्न अनेक युवकांना पडलेला आहे.