Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी २२ वर्षीय तरुणास पाच दिवसांची पोलिस कोठडी... -आरमोरी...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी २२ वर्षीय तरुणास पाच दिवसांची पोलिस कोठडी… -आरमोरी तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-पूर्वी एखाद्याकडेच महागडा  अँड्रॉइड मोबाईल फोन असायचा.मात्र,सध्या स्थितीत गरिबातला-गरीब जरी असला तरीही त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन दिसून येतो.काही नागरिक सोडता जवळपास ९९ टक्के लोकं जिकडे पाहावे तिकडे मोबाईल वरती काही ना काही तरी पाहत असतातच. त्यातच आजची तरुणाई व्हॉट्सॲप,फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट,मॅसेंजर व विविध नाना तऱ्हेचे सोशल मीडियावर चॅटिंग करून दिवसभर मनोरंजन करीत असतात. अशातच चॅटिंग करता-करता एखाद्या जोडप्यांचे सुत जुळून येतात,तर एखादा त्यात अडकून पडतो व जेलची हवा खात असतो.असाच काहीसा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात उघडकीस आला आहे.आधी फेसबुकवर मैत्री अन् नंतर अत्याचार केल्याप्रकरणी प्रकरणी पोलीस कोठडी.
फेसबुकवर एका अल्पवयीन मुलीची एका अनोळखी तरुणाशी मैत्री झाली.मैत्रीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याची खळबळजनक घटना काल, रविवारी ३ नोव्हेंबरला येथे उघडकीस आली. सुजित कैलास गेडाम वय २२ वर्षे,रा.मोहाडी ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर,असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,पीडित १७ वर्षीय मुलीसोबत सुजित गेडामची पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली.त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले.यातून दोघांत प्रेम बहरले.दरम्यान,ऑक्टोंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुजितने मुलीला आपल्या गावी भेटण्यास बोलावले.त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान,नंतर ती गावी परतली.तिने याबाबत कुटुंबीयास सांगितल्यावर आरमोरी ठाण्यात भारतीय न्याय संहिता ६४(१), ६४ (२) (i), ६४(२) (२)८७, १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आरमोरी पोलिसांनी ३१ ऑक्टोंबरला आरोपीस त्याच्या गावातून ताब्यात घेतले.त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!