Wednesday, September 9, 2026
Homeभंडाराअन् क्षणातच आगीने केले रौद्ररूप धारण; घरातील साहित्यांचा अक्षरशः कोळसा..!

अन् क्षणातच आगीने केले रौद्ररूप धारण; घरातील साहित्यांचा अक्षरशः कोळसा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका छोट्याश्या चुकीने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना आज,शुक्रवार २३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्याच्या नांदेड गावात उघडकीस आली.चुलीत लावलेली लाकडे विझल्याचे समजून घरातील डिझेल साठवलेल्या बॅरेलजवळ ठेवण्यात आली.अश्यातच लाकडातील विस्तवाने पेट घेत तब्बल ४० लिटर डिझेलच्या बॅरेलला गाठताच आगीने क्षणात रौद्ररूप धारण करून बॅरेलचा स्फोट झाला.यात नांदेड येथील रहिवासी मिथून गोपीचंद बावनकर यांच्या संपूर्ण घराला आगीच्या ज्वाळांनी वेढल्याने दोन मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णतः जळून खाक झाल्या,यासह घरात बसविलेले फ्रिज,एसी सह वर्षभराची कमाई,शेतातील साठा,कपडे, भांडी आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचा अक्षरशः कोळसा झाला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बावनकर कुटूंबीय उघड्यावर आले आहे.आगीचे रौद्ररूप इतके भीषण होते की गावकऱ्यांनी जोरजोराने आरडाओरड करून घटनास्थळाकडे धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.बऱ्याच वेळा पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणल्या गेली.घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.तोपर्यंत संपूर्ण साहित्ये जळून खाक झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!