Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीक्षयरोग रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी महिला शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत करण्यात येणार फूड बास्केटचा...

क्षयरोग रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी महिला शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत करण्यात येणार फूड बास्केटचा पुरवठा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्षयरोग (टीबी)रुग्णांच्या आरोग्य सुधारणा व पोषणासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि ‘उमेद’ (एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प)यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.या करारानुसार संबंधित क्षयरोग रुग्णांना दररोज फूड बास्केट पुरविण्यात येणार असून हा करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.
हा फूड बास्केट पुरवठा ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी येणारा संपूर्ण खर्च जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याने रुग्णांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही.
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, ‘उमेद’ कडून एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर, ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीच्या संचालिका संध्या गेडाम व सुनीता शेंडे तसेच खनिज प्रतिष्ठानचे डॉ.तारीक उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या फूड बास्केटमध्ये धान्ये,ज्वारी-भाजरीसारखी भरड धान्ये,विविध डाळी, वनस्पतीजन्य खाद्यतेल,दुधाची भुकटी,दूध, भुईमूंग, अंडी आदी पोषणमूल्यांनी परिपूर्ण साहित्याचा समावेश राहणार आहे.क्षयरोग रुग्णांच्या उपचारांसोबतच त्यांचे पोषण सुधारावे,आजारावर मात करण्याची क्षमता वाढावी आणि उपचारांचा अपेक्षित परिणाम साधता यावा,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महिलांच्या शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत फूड बास्केट पुरवठा केल्याने महिला सक्षमीकरणालाही यातून चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्य वाढीस मदत होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!